.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महसूल गळती आणि तिकीट विक्रीतील अनियमितता रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६दरम्यान राबविलेल्या मोहिमेत २८ हजार ६५३ प्रकरणे आढळून आली. त्यामध्ये पैसे घेऊन तिकीट न देणे, विनातिकीट प्रवासास परवानगी देणे, कमी भाडे आकारणे, जुन्या तिकिटांची पुनर्विक्री करणे, रोख रकमेत तफावत असे प्रकार आढळले.