

MSRTC Employees DA Hike ST Employees Salary
esakal
ST Employees Dearness Allowance : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत महायुती सरकारने महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत ही घोषणा करत महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती दिली. तसेच घरभाडे भत्त्यासह इतर आर्थिक लाभांमध्येही वाढ करण्यात आली असून कर्मचाऱ्यांच्या थकबाकीसह सुमारे ५ हजार ६४९ कोटी रुपयांची देणी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.