

MSRTC Employee: एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं वेतन अर्धंच मिळणार असल्यानं कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पुण्याती एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन द्यावं अशी मागणी केली जात आहे. सरकारकडून मागणीच्या तुलनेत अर्धाच निधी मिळाल्यानं कर्मचाऱ्यांना देण्यात य़ेणारं वेतनही अर्धंच दिलं जाणार आहे. याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व विभाग नियंत्रण कार्यालयांना देण्यात आल्या आहे. यानंतर एसटी कर्मचारी संतप्त झाले आहेत.