पावसाळी पर्यटनासाठी एमटीडीसी सज्ज; राज्य सरकारच्या अधिकृत आदेशाची प्रतिक्षा..

सकाळ वृत्तसेवा  
Wednesday, 24 June 2020

राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली. दरवर्षी प्रमाणे पर्यटकांना पावसाळी पर्यटनाचे वेध लागले आहेत. परंतु सध्या कोरोनाच्या संकटामुळे पर्यटनकांना पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येत नाही.

मुंबई: राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली. दरवर्षी प्रमाणे पर्यटकांना पावसाळी पर्यटनाचे वेध लागले आहेत. परंतु सध्या कोरोनाच्या संकटामुळे पर्यटनकांना पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. अनलॉक 0.2 मध्ये पर्यटकांना काही प्रमाणात पर्यटनाचा आनंद मिळण्याची शक्यता आहे. पावसाळी पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी)आपली रिसॉर्ट  सज्ज ठेवली आहेत. पण पर्यटनाबाबत राज्य सरकारच्या अधिकृत आदेशाच्या प्रतिक्षेत एमटीडीसी आहे. 

पुनश्च हरिओम म्हणत राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. जुलै महिन्यात अनलॉक 02 मध्ये पर्यटनाबबात राज्य सरकार शिथिलता आणते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून देशासह राज्यातील पर्यटन व्यवसाय ठप्प आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यातील पर्यटक अलिबाग, माथेरान, खंडाळा तसेच गड-किल्ल्याच्या भेटीला जातात. 

हेही वाचा: बापरे! मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कामगारांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; 'हे' आहे कारण..

परंतु कोरोनामुळे या वर्षी पर्यटन कितपत शक्य आहे, याबद्दल शंका आहे. तरिही मागील दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पावासाने पर्यटकांनी कल्याण, नवी मुंबईतील काही पर्यटनस्थळी हजेरी लावली. परंतु तेथील स्थानिकांनी पर्यटकांना कोरोनाच्या भीतीने विरोध केला. लॉकडाऊनमुळे गेले तीन महिने लोक घरी बसून कंटाळी आहे. त्यामुळे रिफ्रेश होण्यासाठी जवळच्या पर्यटन स्थळांना भेट देण्याची शक्यता आहे. 

मात्र त्या ठिकाणी पर्यटकांची सुरक्षा ही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या वेळी जवळच्या पर्यटन स्थळांना पर्यटकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने जागा सॅनिटाईज करणे, स्वच्छता, सोशल डिस्टन्स, मर्यादित बुकींग या गोष्टी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याबाबत राज्य सरकारने अधिकृत धोरण जाहीर करणे आवश्यक आहे, अशी मागणी स्थानिक पर्यटक व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. 

राज्यात एमटीडीसीचे एकूण 85 रिसॉर्ट आहेत, त्यापैकी 23 रिसॉर्टचे व्यवस्थापन स्वतः एमटीसीकडे आहे. या सर्व रिसॉर्टचे नियमितपणे सॅनेटाईझेशन केले जाते. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे. पर्यटनाला परवानगी मिळाल्यास राज्य सरकारच्या सर्व निर्देशांचे पालन एमटीडीसी करेल. सोशन डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, स्वच्छता, मर्यादित पर्यटक संख्या, थर्मल तपासणी आदी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व  यंत्रणा पर्यटन स्थळी  व रिसॉर्ट येथे एमटीडीसीतर्फे दाखल करण्यात येणार आहेत. 

हेही वाचा : "गोपीचंद पडळकर यांना मानसोपचाराची गरज"; रुपाली चाकणकर यांचे प्रत्युत्तर.. 

"पर्यटकांनी त्याच्या घराच्या जवळील पर्यटन ठिकाणी पर्यटनसाठी जावे. दूरचा प्रवास आणि गर्दीचे ठिकाण टाळावीत. पावसाळी पर्यटनसाठी एमटीडीसी सज्ज आहे. राज्य सरकारच्या पर्यटन सुरू करण्याबाबत अधिकृत आदेशानंतर एमटीडीसीतर्फे पर्यटन सुरू करण्यात येणार आहे.  त्यावेळी पर्यटकांच्या सुरक्षेला  प्राधान्य देण्यात येईल", असे एमटीडीसीचे संचालक अभिमन्यू काळे यांनी सांगितले आहे.  

MTDC is eady for rainy season tourism read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MTDC is eady for rainy season tourism read full story