Ladki Bahin Yojana E-KYC
esakal
Ladki Bahin Yojana Beneficiaries must complete e-KYC: महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली होती. मात्र, काही अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं पुढे आलं आहे. त्यामुळे सरकारने आता लाडक्या बहिणींना ई- केवायसी अनिवार्य केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच या ई-केवायसीसाठी दोन महिन्यांची मुदत असल्याचंही त्यांनी सांगितलं.