Summary
सप्टेंबर हप्त्यासाठीची रक्कम मिळण्यासाठी आता केवळ प्रक्रियात्मक पावले बाकी आहेत.
या योजनेचा लाभ फक्त अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांनाच मिळेल.
पात्र महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असून त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. मात्र आता ही प्रतिक्षा संपणार असून लवकरच हप्त्याची रक्कम मिळणार आहे. याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी महिला व बालविकास विभागाकडे 410 कोटी रुपये वर्ग केले आहेत, त्यामुळे लवकरच खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे.