

Mumbai-Ahmedabad Bullet Train
ESakal
मुंबई : भारताचा पहिला बुलेट ट्रेन कॉरिडॉर म्हणजे मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर मुंबईत तयार केला जात आहे. सरकारने या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम हाती घेतले असून जपानच्या शिंकांसेन तंत्रज्ञान आणि कार्यप्रणालीचा वापर करून हा प्रकल्प उभारला जात आहे. अशातच बहुप्रतिक्षित बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्यामध्ये या प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती दिली आहे.