

Mumbai Goa Highway Toll Collection news update
esakal
Nitin Gadkari Mumbai Goa highway : तब्बल १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही प्रशासनाने टोल वसुली सुरू केल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून अपूर्ण कामांमुळे प्रवास धोकादायक बनला आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांनी “रस्ता पूर्ण करा, मगच टोल घ्या” अशी जोरदार मागणी केली आहे.