
Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनचे पुनरागमन झाले असून मुंबई आणि पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली असून लोकल ट्रेन २० ते २५ मिनिटे उशिरा धावत आहेत. तर पुण्यातही संततधार सुरु असून आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदीत जमलेल्या वारकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.