Eknath shinde: खोके दिन, गद्दार दिन साजरा करणं राष्ट्रवादी, ठाकरे गटाच्या नेत्यांना भोवणार! मुंबई पोलिसांकडून पदाधिकाऱ्यांना नोटीस

खोके दिन, गद्दार दिन साजरा करण्यास मुंबई पोलिसांकडून प्रतिबंध
cm Eknath Shinde Opposition parties alliance in lok sabha election 2024 political news
cm Eknath Shinde Opposition parties alliance in lok sabha election 2024 political news esakal

शिवसेना ठाकरे गटाकडून आज खोके दिन साजर करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आज गद्दार दिन म्हणून साजरा करणार आहे. मात्र असा कुठलाही दिवस साजरा करण्यास मुंबई पोलिसांकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. तर मुंबई पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देखील पाठवण्यात आल्यात.(Latest Marathi News)

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी याच दिवशी बंड केल्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच म्हणजेच 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदार आणि खासदार यांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड केलं होतं.(Latest Marathi News)

cm Eknath Shinde Opposition parties alliance in lok sabha election 2024 political news
Congress : युवक काँग्रेसचे चार पदाधिकारी निलंबित; बैठकीत खुर्च्या फेकणे भोवलं

या सर्व घडामोडी घडून आज एक वर्ष पूर्ण झालं. या निमित्ताने आज खोके दिन तसंच गद्दार दिन साजरा केला जात आहे. ठाकरे गटाच्या तसंच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. मात्र यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ठाकरे गटाच्या शाखाप्रमुख त्यासोबतच माजी नगरसेवकांना आणि काही नेत्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवल्या आहेत.(Latest Marathi News)

cm Eknath Shinde Opposition parties alliance in lok sabha election 2024 political news
Shivsena Vardhapan Din News : सगळ्या शिवसैनिकांना जय महाराष्ट्र !; छगन भुजबळांकडून जून्या आठवणींना उजाळा

अशाप्रकारे कुठलाही दिन साजरा करण्यास मुंबई पोलिसांकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. हे दिन साजरा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना या नोटीसमध्ये देण्यात आली आहे. तर सोशल मिडियावर शेअर होणाऱ्या पोस्ट आणि इतर गोष्टी यामुळे गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आहेत.(Latest Marathi News)

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार खासदार यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाल आहे. या निमित्ताने शिवसेना आजचा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा करणार आहे तर ठाकरे गट जागतिक खोके दिन म्हणून पाळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 20 जून गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com