पूजा ददलानी CCTV फुटेज प्रकरण : मुंबई पोलिस नोंदविणार खंडणीचा गुन्हा?

Pooja Dadlani
Pooja Dadlanigoogle

मुंबई : अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने (Pooja Dadlani) ड्रग्स प्रकरणात आर्यनला (aryan khan drugs case) वाचविण्यासाठी के. पी. गोसावीला पैसे दिल्याचा आरोप सॅम डिसूझाने केला होता. तसेच मुंबई पोलिसांच्या (mumbai police) हाती सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून त्यामध्ये पूजा ददलानीची कार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांच्या एसआयटी टीमकडून खंडणीचा गुन्हा नोंदविण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळतेय.

Pooja Dadlani
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीची मुंबई पोलीस करणार चौकशी

पूजा ददलानीला तीन दिवसांपूर्वी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, प्रकृतीचे कारण सांगून वेळ वाढवून मागितली होती. पूजा ददलानीचा जबाब नोंदविण्यात अडचणी येत असल्यामुळे गुन्हा नोंद करायचा कसा? असा प्रश्न पोलिसांसमोर आहे. कारण पूजा हिच त्यावेळी घटनास्थळी उपस्थित होती. तिच्या जबाबाशिवाय पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदविता येणार नाही, असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. जर पूजा ददलानी तिचा जबाब नोंदवायला आली नाही तर मुंबई पोलिस कायदेशीर मत घेऊन याप्रकरणी सुओमोटो एफआयआर दाखल करायचा की नाही याचा निर्णय घेतील. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांचे जबाब नोंदवले आहेत. मुंबई पोलिसांनी सॅम डिसूझालाही समन्स बजावले असून आतापर्यंतच्या तपासात समीर वानखेडे किंवा एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा थेट संबंध सिद्ध झालेला नाही.

नेमकं काय आहे प्रकरण? -

गेल्या २ ऑक्टोबरला आर्यन खानला ड्रग्सप्रकरणी अटक करण्यात आली. हे प्रकरण दाबण्यासाठी खंडणी देण्यात आल्याचा आरोप एनसीबीचा पंच प्रभाकर साईलने केला होता. त्याने सॅम डिसूझा आणि केपी गोसावीचा उल्लेख केला होता. तसेच पूजाने आर्यनला वाचविण्यासाठी के. पी. गोसावीला ५० लाख रुपये दिल्याचा गौप्यस्फोट सॅम डिसूझाने केला होता. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचं लोअर परळमधलं मर्सिडीज कारचं सीसीटीव्हीही फुटेज एसआयटीच्या हाती लागलं आहे. ५० लाख रुपयांची डील याच ठिकाणी झाल्याचं बोललं जातं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com