

Mumbai-Pune Expressway Missing Link Accident
ESakal
मुंबई : ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण अपघातात पिंपरी चिंचवडमधील वाकडच्या तरुण व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर सहा जण जखमी झाले. भरधाव फॉर्च्युनरने आयशर ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. तुषार वामन भूमकर (वय ३६) असे मृताचे नाव आहे.