

Pune Youth Congress leader dies in Missing Link Accident
ESakal
मुंबई : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एका भरधाव फॉर्च्युनर कारने पाठीमागून मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. या धडकेत फॉर्च्युनर कारचा चक्काचूर झाला असून एकाच जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. तर या अपघातात एक गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतील मृत व्यक्ती पुण्यातील युवा नेता असून या घटनेमुळे परिसरातून शोककळा व्यक्त केली जात आहे.