Mumbai Rain : उष्णतेपासून मुंबईकरांना मिळणार दिलासा; येत्या 2 ते 3 दिवसांत पावसाची शक्यता - IMD | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Update Mumbai Today

हवामान खात्यानं काही भागांत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तवलीये

Mumbai Rain : उष्णतेपासून मुंबईकरांना मिळणार दिलासा; येत्या 2 ते 3 दिवसांत पावसाची शक्यता - IMD

राज्यात पुन्हा एकदा काहीशा प्रमाणात पावसाने सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप सुरु आहे. काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक, गोव्यासह काही भागांत मागील महिन्यात दमदार पाऊस झाला असून पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, आता या महिन्यात राज्यातील बहुतांश ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने आता मुबंईत पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत काही दिवसांपासून अतिशय उष्ण, दमट हवामान आहे. पाऊस नसल्याने आणि आर्द्रतेची उच्च पातळी असल्याने अस्वस्थता निर्देशांक (DI) अधिक आहे. दरम्यान, येत्या 2 ते 3 दिवसांत मुंबईत पावसाची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन घेण्याचे आएमडीकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: Eknath Shinde X Uddhav Thackeray: सत्तेचा सारीपाट, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

दोन दिवसांपूर्वी हवामान खात्यानं देशातील काही भागांत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. यात 3 आणि 4 ऑगस्ट रोजी किनारपट्टीवरील कर्नाटक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. तसेच 2 ते 4 ऑगस्टच्या दरम्यान उत्तर कर्नाटक, केरळात पाऊस होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार काही भागांत पावसाच्या हलक्या सर सुरु झाल्या आहेत.

सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह, ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. मुंबईत पावसानं उघडीप दिल्यामुळं उष्णतेत वाढ झाली होती. मात्र, रात्री पाऊस झाल्यानं हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच दोन दिवसाच्या उघडीपीनंतर लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. औसा आणि निलंगा तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी जमीन खरवडून गेल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, येत्या चार दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

हेही वाचा: गणेशोत्सव २०२२ : शेवटचे पाच दिवस स्पीकर वाजविण्यास रात्री बारापर्यंत परवानगी

लातूर जिल्ह्यात आषाढी एकादशीपासूनच पावसानं जोर धरला आहे. मागील दोन दिवसाच्या उघडीपनंतर काल जिल्हाभरात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. औसा आणि निलंगा तालुक्यातील काही ठिकाणी कमी वेळात तुफान पावसाची नोंद झाली आहे. औसा तालुक्यातील अपचुंदा, तपसेचिचोली, लामजना, मंगरुळ शिवारात कमी कालावधीत तुफान पाऊस झाला आहे. तर निलंगा तालुक्यातील शेडोळ शिवारात अतिवृष्टी झाली आहे.

Web Title: Mumbai Rain Update Upcoming 2 To 3 Days Heavy Rain In Mumbai Weather Forecast Says Imd

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top