

Maharashtra Weather
ESakal
मुंबई : राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांना काही भागात पावसाच्या सरी तर काही ठिकाणी उन्हाच्या कडाक्याचा सामना करावा लागत आहेत. महाराष्ट्रात विविध भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत असून, हवामान विभागाकडून आज यलो अलर्ट जारी करण्यात आला होता, त्यानंतर आता पुन्हा काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.