esakal | केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं मुंडे भगिनी नाराज? फडणवीस म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja and Pritam Munde

Union Cabinet: मुंडे भगिनींच्या नाराजीच्या चर्चेवर फडणवीस म्हणाले...

sakal_logo
By
अमित उजागरे

नाशिक : केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार पार पडला, मात्र यामध्ये खासदार प्रितम मुंडे (Dr. Pritam Munde) यांना स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि प्रितम मुंडे या दोघी भगिनी नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, यावर भाजपने स्पष्टीकरण दिलं असून त्या नाराज नाहीत उगाच त्यांना बदनाम करु नका, असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नाशिक येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. (Munde sisters upset over not getting chance in Union Cabinet Fadnavis said its false)

हेही वाचा: मुंबई : एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात दाखल

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील नव्या चार मंत्र्यांना स्थान देण्यात आलं यामध्ये नारायण राणे, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील आणि डॉ. भारती पवार यांना स्थान देण्यात आलं. दरम्यान, वंजारी समाजाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या डॉ. कराड यांना संधी देण्यात आली पण डॉ. प्रितम मुंडे यांना डावलण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, यावर नाशिक येथे शहर बससेवेच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "मुंडे भगिनी नाराज नाहीत, त्या नाराज असल्याचं कोणी म्हटलंय? पक्षामध्ये हा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला आहे. त्यांनी कुठेही आपण नाराज असल्याचं म्हटलेलं नाही. त्यामुळे त्यांना उगाच बदनाम करु नका, त्या नाराज नाहीत."

दरम्यान, काल केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना प्रितम मुंडे यांना देखील मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्या दिल्लीत दाखल झाल्याच्या बातम्या आल्यानंतर त्यावर स्पष्टीकरण देताना पंकजा मुंडे यांनी ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं की, "या बातम्या खोट्या आहेत मी आणि प्रीतम ताई आमच्या सर्व कुटुंबियांसह मुंबईतल्या निवासस्थानी आहोत. तसेच केंद्रात नव्या मंत्र्यांचे शपथविधी पार पडल्यानंतर मुंडे भगिनींकडून कुठल्याही प्रकारच्या शुभेच्छा देण्यात आल्या नाहीत, त्यामुळं त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

loading image