पुणे : स्वरांचा गोडव्याने आजपासून वसंतोत्सवाची सुरमयी सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

शनिवारचे कार्यक्रम
- सायं 5 वाजता : पूर्बयान चटर्जी (सतारवादन)
- सायं. 6.30 : वसंतराव - एक स्मरण

पुणे : शब्दांना संगीताचे कोंदण देऊन भावनांना ओलं करणाऱ्या गझला आणि शास्रीय संगीताला कवेत घेऊन पाश्चात्य वाद्यांचे रंगलेले पॉवरफुल्ल फ्युजन, त्याला राहुल देशपांडे यांच्या स्वरांचा लाभलेल्या गोडव्याने आज वसंतोत्सवास सुरमयी सुरवात झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षात होणारा हा उत्सव रविवारपर्यंत चालणार आहे. देशातील आघाडीचे आणि प्रसिद्ध गझल गायक अहमद हुसेन आणि महंमद हुसेन यांनी त्यांच्या गायकीतून वसंतोत्सवाच्या प्रांगणात स्वरांचा भाव फुलविला. हुसेन बंधूंनी गझलेच्या या मैफलीची सुरवात गणेश वंदनेने केली. तुलसीदास रचित गायीये गणपती जगवंदन ही रचना सादर केली. शायर हसरत जयपुरी यांच्या चल मेरे साथ चल ऐ मेरी जाने गझल, बशीर बद्र यांच्या कभी यूं भी आ मेरी मे या गझला पेश केल्या.

Video : तेव्हा सांगली बंदचे आवाहन केले असते तर बरे झाले असते : खा. कोल्हे

मै हवा हूं या त्यांच्या प्रसिद्ध गझलेत मुर्च्छना आणि राजस्थानी गायन शैलीची पेरणी करून भावरसातील अवीट छटा उलगडल्या. मौसम आएंगे जाएंगे ही गझल सादर करताना जयपूर गायकीची अनुभूती दिली. आया तेरे दर पर दिवाना या रचनेने त्यांनी भावरसपूर्ण मैफलीचा समारोप केला. त्यांना तबल्यावर अशरार अहमद, गिटार अर्शद अहमद, व्हायोलिनवर इक्बाल वारसी आणि सिंथेसाइजरवर मनीष सोळंकी यांनी साथसंगत केली.
 

पुणे : डीएसकेमध्ये गुंतवणुक करणाऱ्या ठेवीदाराचे पैसे न मिळाल्याने आत्महत्या

रणजीत बारोट हे रात्री आठच्या सुमारास मंचावर आले. बासरी, सिंथेसाईझर आणि ड्रमसेट यांच्या साथीने शास्रीय संगीत, तालबोल यांचा पाश्चात्य वाद्याचा मेळ घालून फ्युजनचा आनंदअनुभव रसिकांना दिला. बासरीवादक अश्विन श्रीनिवासन, सिंथेसाइजरवर आदित्य पौडवाल आणि ड्रमर रणजीत बारोट यांच्या फ्युजनला राहुल यांच्या स्वरांनी मोहक बनविले. वाद्यवृंदाच्या साथीने त्यांनी काश ऐसा कोई मंजर होता ही गझल सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेश दामले यांनी केले.

वसंतोत्सवाच्या पहिल्या दिवशी राहुल देशपांडे यांनी आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "डॉ. वसंतराव देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. गेली अनेक वर्ष हा महोत्सव होतो आहे. कुमार गंधर्वांपासून अनेक दिग्गज कलाकारांचे या महोत्सवात गायन झाले. माझ्या आजोबांना कोणताच गायन प्रकार वर्ज़्य नव्हता. शास्रीय संगीतापासून लावणीपर्यंत सर्व प्रकारांना त्यांनी स्पर्श केला. त्यांच्या सांगीतिक विश्वाची व्याप्ती महासागरासारखी आहे, त्याचा तळ सापडणार नाही.

शनिवारचे कार्यक्रम
- सायं 5 वाजता : पूर्बयान चटर्जी (सतारवादन)
- सायं. 6.30 : वसंतराव - एक स्मरण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Musical treat Vasantotsav starts in Pune