पाकिस्तानाला मोफत लस देताना कोठे होते हिंदुत्व? नाना पटोले

फडणवीसांच्या सभेत बाहेरच्या जिल्ह्यातील लोक -नाना पटोले
nana patole
nana patoleesakal

कोल्हापूर: कोरानाच्या काळात पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) अचानक लॉकडाऊन केले. यामध्ये लाखो लोकांची उपासमार झाली. याउलट भारतात तयार झालेली कोरोना प्रतिबंधक लस पाकिस्तानाला (Pakistan) मोफत दिली. त्यावेळी यांचे हिंदुत्व कोठे होते असा सवाल करत देशात एकीकडे हिंदुच्या जीवावर सत्तेत आला. त्या हिंदुना मरायच्या व्यवस्थेत सोडले. गंगासारख्या पवित्र नदीत हिंदुंची प्रेत तरंगताना संपूर्ण जगाने पाहिले, त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे होते, अशी टिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज केली. येथील एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

nana patole
रात्री झोपून देश समजत नाही, त्यासाठी... ; सदाभाऊंचा टोला

पटोले म्हणाले, तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. या पध्दतीची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे होती. देशातील खरेदी क्षमता 83 टक्केने कमी झाली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि मुठभर मित्रांसाठी केंद्र सरकार चालवले जात आहे. हिंदुत्वाच्या नावाने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्या कोल्हापूरमध्ये ज्या पध्दतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही निवडणूका आल्यानंतर हिंदुना मतदानाचे मशिन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्यावतीने सुरु झाल आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलेल्या कामाबद्दल टिका करण्यासाठी बाहेरचे लोक आणावे लागले. भाजपला शेतकरी, कामगार, उद्योजक, व्यावसायिकांची चिंता नाही, त्यामुळे ते धर्माच्या नावाखाली निवडणूक लढवत आहेत. आम्ही श्रीराम मानतो, आम्हीही हिंदुच आहोत. पण देवांचा वापर निवडणूकीसाठी करत नाही. असाही टोल श्री पटोले यांनी लगावला.

nana patole
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे ; जाणून घ्या एका क्लिकवर

फडणवीसांच्या सभेत बाहेरच्या जिल्ह्यातील लोक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काल केंद्र सरकारे तरुणांना नोकरी दिली, गरीबी कमी केली, शेतकऱ्यांचे उत्पन्न दिडपट वाढवले, बेरोजगारांचे प्रश्‍न सोडवले, महागाई आटोक्‍यात आणली म्हणून सांगितली असे वाटले होते. पण, याविषयावर बोलायला त्यांना मुद्दा नाही त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा घेवून ते या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीत उतरले आहेत. कोल्हापूर हे राजर्षी शाहू महाराज यांचे गाव आहे. येथे सर्वधर्म समभाव, समतेचा विचार रुजवला जातो. त्याच शहरात जातीयता पेरण्याचे काम केले आहे. दरम्यान, फडणवीस यांच्या सभेला काल त्यांना कोल्हापूर उत्तर मतदार संघातील लोक सभेलाही मिळाली नाहीत. त्यांमुळे बाहेरच लोक आणावे लागले असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात आधी राम लल्लाची स्थापना केली. त्याठिकाणच्या भूमिचे पुजन केले. त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला होता. पण राजकारणात भगवान रामांच्या नावाचा वापर राजकारणात केला नाही. भारतीय जनता पक्ष देवाच्या नावाचे नाव घेवून घालच्या पातळीवरील राजकारण केले जात असल्याचेही श्री पटोले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com