छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शेवटी तुम्ही छोटे; नाना पटोलेंचा टोला

नाना पटोले यांनी ट्वीटद्वारे मोदींवर टीकास्त्र सोडले
Nana Patole
Nana Patoleटिम ई सकाळ

पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे येथे त्यांनी मेट्रोचं उद्घाटन केले. मोदींच्या पुणे दौऱ्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाकडून विरोध केला जात आहे. काँग्रेसकडून 'महाराष्ट्रद्रोही मोदी परत जा' असे बॅनर लावत पुण्यात जोरदार आंदोलनसुद्धा करण्यात आले. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतचा फोटो ट्वीट करत मोदींवर टीकास्त्र सोडले आहेत.

Nana Patole
अमृतसर : BSFच्या मेसवर गोळीबार; पाच जवान ठार, अनेक जखमी

नाना पटोले यांनी मोदींचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केलाय. ज्यात ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालेत. महाराजांच्या पुतळ्यासमोर मोदी फोटोमध्ये छोटे दिसत आहे. या फोटोवरुनच नाना पटोले यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र समोर शेवटी तुम्ही छोटे आहात, असा टोला लगावलाय. नाना पटोले ट्वीटद्वारे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र समोर शेवटी तुम्ही छोटे. #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com