Narendra Modi Man Ki Baat : लग्नात काढला अख्ख्या गावाचा विमा, नांदेडच्या 'या' कुटुंबाचे पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये केले कौतुक

Pethkar Family Initiative : प्रत्येक व्यक्तीसाठी १ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात आले. फटाके व मेजवानीऐवजी सामाजिक जबाबदारीचा आदर्श त्यांनी निर्माण केला. यापूर्वीही पेठकर कुटुंबाने हेल्मेट वाटप व विमा शिबिरे आयोजित केली होती.
PM Narendra Modi Highlights Pethkar Family in Man Ki Baat

PM Narendra Modi Highlights Pethkar Family in Man Ki Baat

esakal

Updated on

PM Narendra Modi Highlights Nanded Pethkar Family in Man Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमादरम्यान नांदेड जिल्ह्यातील एका कुटुंबाचे कौतुक केले आहे. या कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त ३,५०० लोकांचा विमा उतरवला, ज्यासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. लग्नांमध्ये सहसा फटाके आणि मेजवानीवर मोठा खर्च केला जातो, परंतु नांदेडच्या कंधार तालुक्यातील बहादूरपुरा गावातील सिद्धेश्वर पेठकर यांच्या कुटुंबाने पाहुण्यांसाठी विमा संरक्षणाची व्यवस्था करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'च्या १३५ व्या भागात या उपक्रमाचा विशेष उल्लेख केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com