शिंदे गटाचे आमदार भाजपच्या मेळाव्यात, चर्चांना उत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

narendra bhondeka news

Narendra Bhondekar: शिंदे गटाचे आमदार भाजपच्या मेळाव्यात, चर्चांना ऊत

भंडारा : एकनाथ शिंदे गटाचे एक आमदार थेट भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिसून आले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी भाषण ठोकून देवेंद्र फडणवीस यांच्या क्षमतांचं कौतुक केलं. त्यामुळे हे आमदार भाजपमध्ये जाणार का? या चर्चांना उधाण आलेलं आहे.

भंडारा येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा होतोय. या मेळाव्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती आहे. या मेळाव्याला शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी हजेरी लावली. याच कार्यक्रमात आ. नरेंद्र भोंडेकर स्टेजवर हजर होते.

भोंडेकर हे भंडारा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. परंतु त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारत त्यांना पाठिंबा दिला होता. आता भंडाऱ्यातील भाजप मेळाव्यामध्ये त्यांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आ. भोंडेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. ते फडणवीसांच्या बाजूलाच बसले होते.

हेही वाचा: Bomb Threat : इराणहून चीनकडे जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याचा अलर्ट, IAF सतर्क

भोंडेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांना मी गुरुस्थानी मानतो. भविष्यात भंडारा नगर परिषदेमध्ये भाजपची सत्ता असेल.