Narendra Dabholkar : रुग्णांना बरे करताना समाजाचा आजार बरा करण्याचा घेतला वसा, डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा अनोखा प्रवास

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे पेशाने डॉक्टर होते.
Narendra Dabholkar
Narendra Dabholkaresakal

Narendra Dabholkar, Medical Doctor Become Community Doctor In Marathi :

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येला आजा १० वर्षे पूर्ण झाली. पण आजवर त्यांच्या हत्त्येचा पूर्ण तपास लागलेला नाही. हा लढा विचारांचा आहे म्हणत अंधश्रद्धानिर्मुलन समितीचे सर्व सभासद विचारांच्या पातळीवर दाभोलकरांचे कार्य पुढे नेत आहेत.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे वैद्यकीय पेशातले होते. पण रुग्णांचे आजार बरे करता करता नंतर समाजाचाच आजार बरा करण्याचा वसा त्यांनी घेतला. जाणून घेऊया.

दाभोलकर आंतरराष्ट्रीय कबड्डी पटू

डॉ. दाभोलकर हे त्यांचे काळातले प्रसिद्ध कबड्डीपटू होते. त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. ज्यावेळी ते कबड्डी खेळत तेव्हा त्यांनी नरुभाऊ म्हणून ओळखले जात. त्यांची हनुमान उडी प्रसिद्ध होती. कबड्डीतल्या कामगिरीसाठी डॉ. दाभोलकरांना महाराष्ट्र सरकारनं शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

त्यांना यातूनच लढण्याची प्रेरणा मिळाली असं ते सांगत असत. त्यांनी क्रीडा संघटक, क्रीडा स्तंभलेखक, कॉमेंट्रेटर अशा भूमिकाही त्यांनी निभावल्या. क्रीडा क्षेत्रात दाभोलकर साधारण २० वर्षे होते.

कबड्डीवरच पहिलं मराठी पुस्तक डॉ. दाभोलकर यांनीच लिहिलं होते.

रुग्णांना बरे करताना समाजाचा आजार बरा करण्याचा घेतला वसा

साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मिरजला वैद्यकीय शिक्षण घेतले. साताऱ्यातच त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. एमबीबीएस डॉक्टर झाल्यावर त्यांनी रुग्णांचे आजार बरे करणे सुरु केले. पण त्यातच त्यांना समाजाच्या आजाराची नाळ सापडली.

डॉ. दाभोलकरांनी मागे वळून पाहताना हा लेख २००७ मध्ये लिहिला होता. त्यात त्यांनी काही वैयक्तीक किस्से सांगितले आहेत. वैद्यकीय व्यवसाय करताना १९७१ मध्ये समाजवादी युवक दल नावाने सामाजिक काम सुरु केलं. त्यात काही मित्रच होते. पण काही काळाने ते बंद पडलं.

विवेकवादी विचारवंत बी. प्रेमानंद यांनी डॉ. दाभोलकरांना समाजाला बरे करण्याची प्रेरणा दिली. त्यांनी देशभर फिरून विज्ञानवादी दृष्टीकोनाचा प्रसार केला. बी. प्रेमानंद यांनी बुवाबाजीच्या चमत्कारांची केलेली भांडाफोड पाहून डॉ. दाभोलकरांनीही काही मित्रांच्या मदतीनं पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरात असे प्रयोग करू लागले.

हे प्रयोग पाहण्यासाठी बरीच गर्दी जमत असे. महाराष्ट्रात हे काम रुजायला हवं. ती महाराष्ट्राची गरज आहे. असा विचार करून दाभोलकरांनी या कामाला स्वतःला झोकून दिलं. १९८५ नंतर दोन वर्ष दाभोलकर महाराष्ट्रभर फिरले आणि १९८९ मध्ये त्यांनी अंधश्रदेधा निर्मुलनाच्या संस्थात्मक कामास सुरुवात केली.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीची स्थापना

डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मुलनाच काम खरंतर १९८१-८२ पासूनच सुरू केलं होतं. त्यावेळी ते अखिल भारतीय अंधश्रदेधा निर्मुलन समितीत कार्यरत होते. मात्र पुढे १९८९ मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची त्यांनी स्थापना केली. अखेरपर्यंत ते या समितीचे काम करत राहीले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com