Nashik Bus Accident: बस अपघातावरुन नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Bus Accident

Nashik Bus Accident: बस अपघातावरुन नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा

नाशिकः नाशिक-औरंगाबाद महामार्गावर एका खाजगी बसला भीषण आग लागली. यामध्ये तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

´´हा बस अपघात ´ईडी´मय असलेल्या भाजपचे पाप आहे. शिवाय राज्यात खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन नागरिकांचा जीव जातोय. पण सरकारला गांभीर्य नाही´´ अशा भावना नाना पटोले यांनी व्यक्त केल्या. आज पहाटे पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला आहे.

हेही वाचा: Nashik Bus Accident : "डोळ्यादेखत लोकांचा कोळसा होत होता, मी 2-3 जणांनाच वाचवू शकलो"

दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, याचा तपास होईल" असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जखमींना शासनातर्फे मोफत उपचार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. तर मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.