Crime News : विवाहितेवर सामूहिक अत्याचार; दगडाने ठेचून केली हत्या

Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal

नाशिकः एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करुन तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यानी पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत.

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या झाल्याने गावात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. घटनेमुळे गावकरी संतप्त झाले असून घोटी पोलीस ठाण्याबाहेर गावकऱ्यांचा मोठा जमाव जमला आहे.

Nashik Crime News
Nana Patole : "कोणी भुट्टा येईल आणि..." सोलापूर-माढा जागेवर दावा सांगत नाना पटोलेंचा रोहित पवारांना टोला

या प्रकरणी पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र घटनास्थळी पोलीस उशिरा पोहोचल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.

Nashik Crime News
monsoon Update : मॉन्सूनबाबत मोठी अपडेट! 'या' कालावधीत धडकणार विदर्भात

महिलेचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा संतप्त गावकऱ्यां घेतला असून घोटी पोलीस ठाण्यातच्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घोटी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com