राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात कोल्हापूर ZP अव्वल; हसन मुश्रीफ

१७ ग्रामपंचायती समावेश करण्यात आला होता.
 National Panchayat Award
National Panchayat Awardesakal

कोल्हापूर : राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर केले आहे. यात दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२२ अंर्तगत उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल ठरली असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी माहिती दिली. कोल्हापूर जिल्हा परिषदेला (Kolhapur ZP) ५० लाख रुपये पुरस्काराची रक्कम मिळणार असून, ग्रामपंचायतीच्या खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येणार असल्याचाही माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

 National Panchayat Award
रात्री झोपून देश समजत नाही, त्यासाठी... ; सदाभाऊंचा टोला

याचबरोबर राहता (जि.अहमदनगर) आणि मालवण (जि.सिंधुदुर्ग) पंचायत समित्यांची निवड करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. यात १७ ग्रामपंचायती समावेश करण्यात आला होता. यामध्ये बालसुलभ ग्राम पंचायत पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील श्रृंगारवाडी ग्रामपंचायतीस आणि ग्राम पंचायत विकास आराखडा पुरस्कार अहमदनगरच्या लोहगाव या ग्रामपंचायतीला मिळाला. तसेच नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार हा राज्यातून उस्मानाबाद जिल्ह्यातील भंडारवाडी या ग्रामपंचायतीला मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

 National Panchayat Award
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे ; जाणून घ्या एका क्लिकवर

पंचायत राज दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे कोणत्याही एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला हजर राहून पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीच्या कार्यास प्रोत्साहन देणार आहेत. राज्यातील इतर ग्रामपंचायतींनीही यावर्षीचे पुरस्कार मिळविण्याच्या दृष्टीने विविध योजना, उपक्रमांची आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी अंमलबजावणी करुन आदर्श कामगिरी करावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे.

 National Panchayat Award
पाकिस्तानाला मोफत लस देताना कोठे होते हिंदुत्व? नाना पटोले

दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२२

मोदाळे (ता.इगतपुरी, जि.नाशिक), लोहगाव (ता.राहता, जि.अहमदनगर), लोणी बुद्रुक (ता.राहता, जि.अहमदनगर), कोतावडे (ता.कडेगाव, जि.सांगली), वाघोली (ता.मोर्शी, जि.अमरावती), बावी (कौल) (ता.जि.उस्मानाबाद), धारुर (ता.जि.उस्मानाबाद), शिरगाव (ता.कडेगाव, जि.सांगली), दरी (ता.जि.नाशिक), नेरी (ता.मोहाडी, जि.भंडारा), श्रृंगारवाडी (ता.आजरा, जि.कोल्हापूर), नन्व्हा (ता.सालेकसा, जि.गोंदिया), धोरोशी (ता.पाटण, जि.सातारा), झरी (ता.लोहा, जि.नांदेड), आरे (ता.गुहागर, जि.रत्नागिरी), मुठेवडगाव (ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर), आणि खानापूर (ता.जि.उस्मानाबाद) या १७ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.

दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

कोल्हापूर जिल्हा परिषदेला ५० लाख रुपये, राहता (जि. अहमदनगर) आणि मालवण (जि. सिंधुदुर्ग) या पंचायत समित्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये आणि १७ ग्रामपंचायतींना लोकसंख्येप्रमाणे ५ ते १५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरुपात थेट खात्यात जमा होणार आहे. श्रृंगारवाडी आणि लोहगार ग्रामपंचायतीस प्रत्येकी ५ लाख रूपये त्याचप्रमाणे नानाजी देशमुख राष्ट्रीय ग्रामसभा गौरव पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस १० लाख रूपये रक्कम पुरस्कार देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com