
Navneet Rana : ''बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या CM शिंदेंनाच धनुष्यबाण मिळेल''
Navneet Rana : सत्तापालट झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद सुप्रीम कोर्टात गेला आहे. अद्याप यावर अंतिम निर्णय झालेला नाही. त्यात धनुष्यबाण चिन्हाबाबत नवनीत राणांनी मोठं विधान केले आहे.
हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
हेही वाचा: Lalit Modi : थेट परदेशातून ललित मोदींची सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना धमकी
मात्र, त्याआधी बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदेंनाच धनुष्यबाण चिन्ह मिळेल असा विश्वास खासदार नवनीत राणांनी व्यक्त केला आहे. आपला हनुमान चालिसेवर विश्वास असून शिंदेंनाच हे चिन्ह मिळेल असे राणा म्हणाल्या आहेत.
हेही वाचा: Shirdi Bus Accident : शिर्डी बस अपघातातील मृतांची ओळख पटली; सात वर्षांच्या चिमुरड्यासह १० ठार
उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
यावेळी राणांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. कोरोना काळात अडीच वर्ष केवळ फेसबुक लाईव्ह वरून राज्यातील सरकार कार्यरत होतं असा टीकादेखील त्यांनी केली.
बाळासाहेबांची विचारधारा एकनाथ शिंदेंसोबत असून, त्यांनाच धनुष्यबाण चिन्ह मिळेल असे राणा म्हणाल्या. जे बाळासाहेबांचे विचार घरात ठेवू शकले नाहीत ते सत्तेसाठी काय संघर्ष करणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
हेही वाचा: Video : बारामतीचं घड्याळ बंद पाडण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बावन्नकुळेंच्या कार्यक्रमात चाललंय काय?
बाळासाहेबांना मानणाऱ्या शिंदेंनाच पुढच्या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह मिळेल आणि याच चिन्हावर ते उमेदवार रिंगणात उतरवतील असा विश्वास राणा यांनी व्यक्त केला आहे.