
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा दिली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. देशभरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जात आहे. तसंच संतापाची लाटही देशभरात आहे. महाराष्ट्रातल्या नेत्यांनीही पाकिस्तानवर यावरून संताप व्यक्त केलाय. दरम्यान, भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोठं भाष्य केलंय. नवनीत राणा यांनी स्वत:च्या मुलाचा उल्लेख करत एकवेळ गोळ्या झेलू पण कुराण वाचणार नाही असं म्हटलंय.