भाजप नेते विखे पाटलांचा दारूचा रॉकेट ब्रॅण्ड; नवाब मलिकांचा आरोप l Nawab Malik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

भाजप नेते विखे पाटलांचा दारूचा रॉकेट ब्रॅण्ड; नवाब मलिकांचा आरोप

मुंबई: राज्य सरकारने सुपरमार्केट (Super Market) आणि वॉक-इन स्टोअरमध्ये वाईन (Wine) विक्रीला परवानगी दिली. या निर्णयानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी टीकेचे झोड उठवले आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik)यांनी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा दारूचा रॉकेट ब्रॅण्ड आहे असा आरोप केला आहे.

हेही वाचा: संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयावर कंगना म्हणाली,क्रांतिकारी निर्णय...

राज्य शासनाने किराणा मॉल्समध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याविरोधात टीका होत आहे. वाईनबाबत भाजपच्या टीकेला उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले, भाजपचे खासदार सांगतात थोडी थोडी पिया करो. दारू पिणारे सगळ्यात जास्त भाजपचे नेते आहेत. भाजपच्या नेत्यांची वाईनची दुकाने आहेत ती बंद करणार आहेत का? असा सवालही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये पेगॅसस प्रकरणाच्या मुद्यावरून भाजप-काँग्रेसमध्ये राडा झाला आहे. यावर नवाब मलिक यांनी प्रतीक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राजकीय पक्षांनी आंदोलनात काही मर्यादा पाळल्या पाहिजेत.एखाद्या राजकीय पक्षाने दुसऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यालयावर, नेत्यांच्या घरी आंदोलन करणे योग्य नाही. तसेच दुसर्‍या राजकीय पक्षाच्या आंदोलनात घुसणेही योग्य नाही यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक पक्षाने याबाबत आचारसंहिता लागू केली पाहिजे ही पद्धत थांबली पाहिजे. तसेच सर्व पक्षांनी आचारसंहिता पाळली पाहिजे असे ही ते म्हणाले.

Web Title: Nawab Malik Criticized On Radhakrishna Vikhe Patil Supermarket Wine Sell

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..