संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयावर कंगना म्हणाली,क्रांतिकारी निर्णय...

कंगणाकडून संरक्षण मंत्रालयाचे कौतुक
Kangana Ranaut
Kangana Ranautesakal

मुंबई: भारत सरकारने भारतीय हवाई दलात (IAF) महिला लढाऊ वैमानिकांचा समावेश करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरु असलेल्या पायलट योजनेचे कायमस्वरूपी योजनेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मंगळवारी ट्विट करत याबाबतची घोषणा केली. राजनाथ सिंह यांनी ही घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचे कौतुक केले. यावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनेही मत व्यक्त केले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर याविषयी मत मांडले आहे.

Kangana Ranaut
संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता महिला फाइटर पायलट होणार पर्मनंट

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे ट्रोल होत असते. तरीही ती आपला मुद्दा मांडत राहते आणि तो योग्य कसा आहे हे समजावून सांगते. यावेळी मात्र तिने संरक्षण मंत्रालयाचे (MoD) कौतुक केले आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर राजनाथ सिंह यांच्या ट्विटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय क्रांतिकारी आहे. या निर्णयामुळे आता भारतीय हवाई दलात आणखी महिला लढाऊ वैमानिक पाहायला मिळतील. असे मत तीने मांडले आहे.

आत्तापर्यंत 16 महिला फायटर

आत्तापर्यंत 16 महिला फायटर पायलट यांना IAF मध्ये नियुक्त करण्यात आले आहे. याला कायमस्वरूपी योजना बनवण्यास आता MoD ने मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्रालयाने 2015 मध्ये महिलांना हवाई दलात फायटर पायलट म्हणून सामील होण्यास परवानगी दिली होती, परंतु “Induction of Women SSC officers in Fighter Stream of Flying Branch” ची योजना 2016 मध्ये सुरू झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com