
नवाब मलिकांच्या तिन्ही मागण्या मान्य; मुंबई सत्र न्यायालय म्हणालं....
मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीने (ED) छापा टाकला आहे. यानंतर त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले. सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर मलिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांना तीन मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर ईडीच्या गाडीत बसताना नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, “अटक करण्यात आली आहे पण आम्ही घाबरलेलो नाही. आम्ही लढणार आणि जिंकणार आहोत.” (Nawab malik arrested by ED)
हेही वाचा: बाबांच्या अटकेवर निलोफर मलिकांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'डी-कंपनीशी प्रत्येकाचाच...'
नवाब मलिक यांच्या तिन्ही मागण्या मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केल्या आहेत. नवाब मलिक यांनी काल कोर्टात विनंती केली होती की, त्यांना ईडी कस्टडीत असताना घरचे जेवण देण्यात यावे. तसेच तपासादरम्यान त्यांच्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच त्यांचे औषध देण्याकरिता त्यांना परवानगी देण्यात यावी. या तिन्ही मागण्या मुंबई सत्र न्यायालयाने आज मान्य केल्या आहेत.
हेही वाचा: भारताने युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करावी; युक्रेन राजदुतांची PM मोदींकडे याचना
दरम्यान, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक या म्हणाल्या की, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आम्ही हे ऐकतोय की ईडी येणार आहे. तसेच माझ्या वडीलांनी आम्हाला दक्षता घेण्यास सांगितलं होतं. मात्र, आम्ही सगळं काही योग्य पद्धतीनेच केलंय. माझे वडील कसलीही भीड न बाळगता बोलताता त्यामुळेच ईडी आणि एनसीबी आमच्या मागे लागली आहे.
मला अशी खात्री आहे की, माझे वडील नक्कीच बाहेर येतील. ही न्यायालयीन लढाई असून आम्ही ती जरुर लढू. एक मुस्लीम म्हणून प्रत्येक मुस्लीम जो सार्वजनिक जीवनात कार्य करतो आहे तो डी कंपनीशी संबंधित असल्याचा नेहमीच दावा केला जातो. अशाप्रकारचा दावा करणं अर्थातच आम्हा मुस्लीमांवरील अन्याय आहे.
Web Title: Nawab Malik Ed Arrest Accepted All Three Demands Of Nawab Malik Mumbai Sessions Court
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..