
मलिकांच्या कोठडीत आणखी वाढ; सुप्रीम कोर्टातील याचिकेकडं लक्ष
मुंबई : मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी चार दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दिलेली त्यांची कोठडी आज संपत असल्यानं त्यांना मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टानं त्यांना २२ एप्रिलपर्यंत आणखी चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मनी लॉंड्रिग प्रकरणात मलिक यांना ईडीनं अटक केली होती. सध्या ते ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. (Nawab Malik Judicial costody increase for four days Special PMLA Court Decision)
हेही वाचा: लाऊडस्पीकरसाठी येणार गाईडलाईन्स; गृहमंत्र्यांची माहिती
कोर्टात आज काय घटलं?
न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं नवाब मलिक यांना आज पुन्हा एकदा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान, नवाब मलिक यांनी आपल्या तातडीच्या सुटकेसाठी आणि ईडीच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. आपली अटक ही बेकयदा असल्याचा दावा त्यांनी या याचिकेतून केला आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.
हेही वाचा: स्कूल बसच्या भाड्यात तिप्पट वाढ; पुणेकरांना महागाईचा झटका!
त्यामुळं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवून न देता त्यांना फक्त ४ दिवसांची कोठडी वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळं २२ एप्रिलपर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, जर तत्पूर्वी जर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि काही निकाल आला तर मात्र हे चित्र बदलेलं अन्यथा पुन्हा २२ तारखेनंतर मलिकांना कोर्टासमोर हजर करावं लागेल.
Web Title: Nawab Malik Judicial Custody Increase For Four Days Special Pmla Court Decision
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..