मंत्री नवाब मलिकांना मोठा दणका; न्यायालयीन कोठडीत वाढ

न्यायालयाच्या निर्णयामुळे मंत्री नवाब मलिक यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
Nawab Malik
Nawab Maliksakal media
Summary

न्यायालयाच्या निर्णयामुळे मंत्री नवाब मलिक यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे मंत्री नवाब मलिक यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आजही दिलासा मिळू शकलेला नाही. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांना रमजान काळात कोठडीत राहावं लागणार आहे.

दरम्यान, मागील वेळीस नवाब मलिकांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली होती. यानंतर नवाब मलिक यांच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केल होतं. 'बड़ी जीत का बड़ा शोर होगा तुम्हारा सिर्फ वक़्त है, हमारा दौर होगा' असं म्हणत नवाब मलिक यांनी एक इशाराच दिला होता. आता ऐन रमजानच्या पाक महिन्यात मंत्री मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाल्याने चर्चा जोर धरु लागल्या आहेत.

राज्याच्या विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनादरम्यानही विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकत मलिकांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. यासाठी त्यांनी पायऱ्यांवरच आंदोलन केलं. नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी विरोधकांनी घोषणाबाजी केली होती. नवाब मलिक देशाचे गद्दार असल्याच्या आशयाच्या घोषणा विरोधकांनी दिल्या होत्या. नवाब मलिक दाऊदचे दलाल आहेत अशी घोषणाबाजी केली होती. त्यामुळे नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन अधिवेशनापूर्वीच राजकीय वातावरणही तापलं होतं.

Nawab Malik
राज ठाकरेंनी भाजपसोबत असल्याचं जाहीर करावं; सेना नेत्याचं चॅलेंज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com