बनावट नोटांवरून मलिकांचा वानखेडेंवर नवा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik
बनावट नोटांवरून मलिकांचा वानखेडेंवर नवा आरोप

बनावट नोटांवरून मलिकांचा वानखेडेंवर नवा आरोप

मुंबई: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मलिक यांनी आज त्यांच्यावर आरोप करताना, नाव समीर दाऊद वानखेडे आणि त्यांचा धर्म मुस्लीम लिहीला असल्याचा कागदपत्रांचे पुरावे समोर आणले आहेत. यावेळी समीर वानखेडे हे खोटे कागपत्र आणि खोट्या नोटांचे मास्टर असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा: समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख

समीर वानखेडेंच्या बद्दलचे खरे कागदपत्र आम्ही न्यायालयालमोर ठेवले आहेत. वानखेडेंनी सर्व महानगरपालिकेच्या कागपत्रांवर खाडा-खोड करून १९९३ साली नवा रेकॉर्ड तयार केला. तसेच कागदपत्र गहाळ करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मात्र त्यांना माहिती नव्हतं की हे स्कॅन करून ठेवलेले असतात. याच आधारावर ते सर्व करता आहेत, मात्र त्यांच्या जन्मापासूनच फर्जीवाडा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच यावेळी त्यांनी समीर वानखेडे हे नकली नोटांचे सुद्धा खेळाडू असल्याचा आरोप केला. समीर वानखेडेंनी एका प्रकरणात १४ कोटी ५६ लाख पकडले होते, त्यावेळी ते ८ लाख दाखवून त्यांनी आरोपींना मदत केली होती असं म्हणत मलिकांनी हे खोट्या नोटा आणि खोटी कागदपत्राचे हे खेळाडू असल्याचा आरोप केला.

हेही वाचा: "पहिली पत्नी लोकांसमोर येऊ नये म्हणून वानखेडेंनी..."; मलिकांचा आरोप

loading image
go to top