Naxalites Back Rahul Gandhi’s Vote Rigging Allegations
esakal
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या वोटचोरीच्या आरोपांनंतर आता मोठं राजकारण तापलं आहे. अनेकांकडून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते आहे. याबाबत निवडणूक आयोगाने खुलासा करावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. अशातच आता नक्षलवाद्यांनीही राहुल गांधी यांच्या आरोपांचं समर्थन केलं आहे. मात्र, यासोबतच त्यांनी काँग्रेसवर टीकाही केली.