esakal | नक्षलवाद्यांनो मुख्य प्रवाहात सामिल व्हा; संभाजीराजेंचं आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji raje

नक्षलवाद्यांनो मुख्य प्रवाहात सामिल व्हा; संभाजीराजेंचं आवाहन

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई : ‘भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे. नक्षलवाद्यांनो, या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. मुख्य प्रवाहात सामील व्हा,’ असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नक्षलवाद्यांना केले आहे. नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या कथित पत्राला उद्देशून त्यांनी हे उत्तर दिले आहे. (Naxals join the mainstream appeal of MP Sambhaji Raje Chatrapati)

हेही वाचा: केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; ज्योतिरादित्य, सोनेवाल यांना संधी?

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच नक्षलवादी संघटनांनी यामध्ये तेल ओतण्याचे काम केले आहे. नक्षलवाद्यांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या कथित पत्रात, ‘मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत’ असं आवाहन केलं आहे. तसेच मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावं, असा इशाराही त्यामध्ये देण्यात आला आहे. या पत्राची दखल घेत संभाजीराजे छत्रपती यांनी नक्षलवाद्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानत आवाहनही केलं आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा लढा हा लोकशाहीच्या मार्गाने संघर्ष करुन लढवला जाण्यावर ठाम असल्याचे संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: भ्रष्टाचाराच्या आरोपांवर 'राम मंदिर ट्रस्ट'ची पहिली प्रतिक्रिया!

संभाजीराजे म्हणाले, “कुठलीच व्यवस्था परिपूर्ण नसते. लोकशाहीबाबत पण काहींचे वेगळे मत असू शकते. परंतू जगभरात आज ती व्यवस्था स्वीकारली गेली आहे. भारतानेही तिचा यशस्वी स्वीकार केला आणि आजपर्यंत आपण यशस्वी वाटचाल सुद्धा करत आलो आहोत. उणीवा दूर करण्याचे प्रयत्न आपण करायचे असतात. क्रांतीचा विचार हा चांगलाच आहे. पण तो विधायक मार्गाने जाणारा असावा. काही लोक या लोकशाही व्यवस्थेत चांगले नसतीलही, पण म्हणून संपूर्ण व्यवस्थाच कुचकामी आहे, असे नसते. लोकांना शिक्षित करून, चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देऊन मतपेटीच्या साहाय्याने पर्याय उभा करून देण्यातच संपूर्ण राष्ट्राची भलाई आहे,”

हेही वाचा: ...तर काँग्रेसला आमच्या शुभेच्छा - शिवसेना

मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत भूमिका निभावली होतीच. त्यांच्या नंतर सुद्धा परकीय शक्तींचा पाडाव करण्यासाठी मराठा समाजाने आपले सातत्याने बलिदान दिलेले आहे. शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा कायम ठेवला आहे. आजही मराठा समाज या लोकशाहीचे रक्षण करण्यास सर्वात पुढे आहे. आम्ही याच लोकशाही व्यवस्थेत लोकशाही मार्गानेच आमचे हक्क मागत आहोत. अवघ्या जगाने आमच्या मूक मोर्चांची दखल घेतली होती. आम्हाला विश्वास आहे की आम्ही आरक्षणही मिळवू आणि समाजाचे इतर प्रश्नही सोडवू, असं आवाहनही संभाजीराजे यांनी केलं.

डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीचे तुम्हीही पाईक व्हा - संभाजीराजे

छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापून लोकशाहीचेच बीजारोपण केले होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोकशाहीचा एक स्तंभच असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते.डॉ. आंबेडकरांनी या देशाच्या नागरिकांच्या, इथल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरूनच भारतात लोकशाही राज्य व्यवस्था केली. तुम्हीसुद्धा तिचे पाईक व्हा, असं आवाहनही यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी नक्षलवाद्यांना केलं.

संपादन - अमित उजागरे

loading image
go to top