esakal | बारामतीला चाललो सांगत अजित पवार पोहोचले आघाडीच्या बैठकीत
sakal

बोलून बातमी शोधा

NCP and Congress Meeting was started

अजित पवार बैठकीत; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे होणार एकमत

बारामतीला चाललो सांगत अजित पवार पोहोचले आघाडीच्या बैठकीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मुंबईत समन्वय समितीची बैठक सुरु झाली आहे. बैठकीला दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित असून बैठकीत राष्ट्र्रावादी, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या जाहिरनाम्यावर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी बारामतीला चाललो आणि समन्वय समितीची बैठक रद्द झाली असे सांगितले होते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, नवाब मलिक, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर काँग्रेसचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नेते उपस्थित आहेत.

अजितदादा म्हणतात No Comments, बंद खोलीत झालं तरी काय ?

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी पुढील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस समन्वय समितीची बैठक कधी होईल याबाबत काहीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी 'No Comments' या व्यतिरिक्त काहीही वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे आघाडीत बिघाडी आहे का? किंवा राष्ट्रवादी पक्षात पदांच्या वाटपावरून काही कलह आहे का? असे प्रश्न अनेकांच्या मनात येत होते.

राष्ट्रवादीसोबतच्या बैठकीबाबत अशोक चव्हाण म्हणाले...

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आज बैठक होणार होती परंतु, बैठकीबाबत कोणत्याच प्रकारची माहिती ना राष्ट्रवादी कडून समोर येते होती, ना कॉंग्रेस कडून. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसवर यानिमित्ताने समन्वय नाही का असा देखील प्रश्न उपस्थित केला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये बैठक सुरु झाली असून सर्व चर्चांना आता विराम मिळाला आहे.

loading image