esakal | सत्तास्थापनेचा गुंता पवारांनी सोडविला; आज होणार शिक्कामोर्तब

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला युतीला जनतेने स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदावरून या दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. शिवसेनेची अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजपने धुडकावून लावल्याने शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापण्यास नकार दिला.

सत्तास्थापनेचा गुंता पवारांनी सोडविला; आज होणार शिक्कामोर्तब
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा गुंता सोडविण्यात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यश आले आहे. आज (बुधवार) काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार असून, या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवसांत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये ठरलेल्या फॉर्मुल्याबाबत स्पष्ट होईल, असे शरद पवार यांनी म्हटल्याच वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

(सौजन्य - टीव्ही 9)

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला युतीला जनतेने स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदावरून या दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. शिवसेनेची अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजपने धुडकावून लावल्याने शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापण्यास नकार दिला. आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून, शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांमध्ये एकमत होताना दिसत आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतील यावरही शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

संजय राऊतांना आज आठवली वाजपेयींची कविता; काय आहे पाहा...

महाराष्ट्रात महाशिवआघाडीचे सरकार येणार हे आता स्पष्ट होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेसोबत कसलीही चर्चा सुरू नसल्याचे पवारांनी म्हटल्यानंतर आज त्यांनी सत्तास्थापनेचा तिढा सुटल्याचे म्हटले आहे. शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. किमान समान कार्यक्रम आज निश्चित होईल. सरकार स्थापनेबाबतची चर्चा 2-3 दिवसात संपेल, असे शरद पवारांनी टीव्ही 9 वाहिनीला माहिती देताना म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज संध्याकाळी दिल्लीत बैठक होत आहे. त्याअगोदर शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. संजय राऊत यांनीही उद्या राज्यातील चित्र स्पष्ट होईल आणि पाच ते सहा दिवसांत सरकार स्थापन होईल, असे म्हटले आहे. 

शरद पवार-नरेंद्र मोदींची दिल्लीत होणार भेट; काय असेल?