खातेवाटपात राष्ट्रवादीचा वरचष्मा; 'या' महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचाही पदभार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह पंधरा मंत्रिपदे मिळाली आहेत. तर, काँग्रेसला बारा मंत्रिपदांवर समाधान मानावे लागले आहे.

मुंबई - शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपद देताना राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक मंत्रिपदे पारड्यात पाडून घेण्यात यश मिळविले आहे. ४३ जणांच्या मंत्रिमंडळात या पक्षाला सर्वाधिक १६ मंत्रिपदे मिळाली आहेत. तसेच आज (रविवार) झालेल्या खातेवाटपातही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना प्रमुख खात्यांची जबाबदारी मिळाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचाही पदभार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह पंधरा मंत्रिपदे मिळाली आहेत. तर, काँग्रेसला बारा मंत्रिपदांवर समाधान मानावे लागले आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेस पक्षाला देण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्रिपदासह ४३ मंत्रिपदे असतात.

अजित पवारांना अर्थमंत्रीपद, तर वळसे पाटील आणि दत्ता भरणेंना 'ही' खाती

महाविकास आघाडीतला शिवसेना हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र, मंत्रिपदाच्या वाटपात ‘राष्ट्रवादी’ने १६ पदे मिळवली आहेत. २००४ मधे ‘राष्ट्रवादी’च्या जागा सर्वाधिक असताना काँग्रेसला मुख्यमंत्रिपद देण्यात आले होते. त्या बदल्यात महत्त्वाची कॅबिनेट मंत्रिपदे ‘राष्ट्रवादी’ने पदरात पाडून घेतली होती. त्याच धर्तीवर आता शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यात आल्याने अधिकची मंत्रिपदे ‘राष्ट्रवादी’ने पटकावली आहेत. त्यात महत्त्वाची खातीही मिळविली आहेत. 

अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती

‘राष्ट्रवादी’कडे उप-मुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ, जलसंपदा, सामजिक न्याय, अन्न व नागरि पुरवठा, अल्पसंख्यांक विकास, गृहनिर्माण, ग्रामविकास अशी महत्त्वाची खाती मिळविली आहेत. काँग्रेसला महसूल, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम अशी खाती मिळाली आहेत. 

पुण्याच्या जावयाला मिळाली गृहमंत्रिपदाची जबाबदारी, पाहा कोण?
सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला कृषीमंत्री! 
चाळीत लहानपण गेलेल्या आव्हाडांकडे गृहनिर्माण मंत्रीपद

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP gets prominent portfolios in Maharashtra government