Adhalrao Patil: "राष्ट्रवादी हा जिहादी पक्ष" आढळराव पाटलांचा अजित पवारांवर निशाणा,म्हणाले...

राष्ट्रवादीला काय झालंय ते कळत नाही
Shivajirao Adhalarao Patil News
Shivajirao Adhalarao Patil Newsesakal
Updated on

Shivajirao Adhalarao Patil : शिवसेनाचे बंडखोर नेते आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. ही भेट पुण्यात झाली आणि या भेटी विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली आशी माहिती आढळराव यांनी दिली.

Shivajirao Adhalarao Patil News
चिंता वाढली! 2023 मध्ये जगभरात आर्थिक मंदीचं सावट; IMF प्रमुखांचा दावा

दरम्यान भेटी नंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यावर निशाना साधला. हिवाळी अधिवेशन चालू असताना शेवटच्या दिवशी बोलत असताना अजित पवार म्हणाले होते की, छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते, ते धर्मवीर नव्हते त्यांमुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.

यावर आढळराव म्हणाले की, "शेकडो वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर मानल जातं पण आता अचानक असे विषय काढले जातात. राष्ट्रवादीला काय झालंय ते कळत नाही. तर त्यांनी भाऊ तोरसेकर यांच एक वाक्य सांगितलं ते म्हणाले की राष्ट्रवादी हा जिहादी पक्ष आहे. आता याबाबत महाराष्ट्राने ठरवावे.

Shivajirao Adhalarao Patil News
J.P. Nadda : जे.पी. नड्डा 'दर्गा'मध्ये गेल्याने वातावरण पेटलं; विरोधक म्हणाले...
Shivajirao Adhalarao Patil News
Shahaji Bapu Patil: आठ दिवसात केले नऊ किलो वजन कमी; कसं काय?

अजित पवारांच्या त्या विधानाने महाराष्ट्रातून संतापाच्या भावना अनेक भागातून समोर येत आहेत, अजित पवार यांनी जे वक्तव्य केलं ते कुठलाही अभ्यास न करता केलेला आहे. चर्चेत राहिचं असेल किंवा त्यांची पवार स्टाईल आहे जे विधान त्यांनी धरणावर केलं तसंच हे विधान आहे.

तर त्यांना खासदार अमोल कोल्हे यांच्या बद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले, " यावर मला काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही. त्यांनी कुठेही जावं त्यांचा आपल्याला काही फरक पडत नाही.

दरम्यान 2024 ची निवडणुक भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र लढणार आणि जिंकणार. तर त्यांनी ठणकावून सांगितले की मला संधी मिळाली तर मी लोकसभा निवडणूक लढवणारच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com