Aditi Tatkare : 'या' जिल्ह्यासाठी NCP नेत्याला शिंदे गटाच्या आमदारांचा विरोध; आदिती तटकरे होणार रत्नागिरीच्या पालकमंत्री?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे रायगड जिल्ह्यातील समर्थक आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहे.
NCP leader Aditi Tatkare
NCP leader Aditi Tatkareesakal
Summary

रायगडमधील शिंदे समर्थक आमदारांना मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळे ते नाराज आहेत.

Ratnagiri News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे रायगड जिल्ह्यातील समर्थक आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना देण्यास शिंदे गटाच्या आमदारांचा विरोध आहे.

या विरोधावर पडदा टाकण्यासाठी आदिती तटकरे यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्याबाबत महायुती सरकारमध्ये विचारविनिमय सुरू असल्याची खात्रीलायक चर्चा आहे. रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याकडे आहे.

NCP leader Aditi Tatkare
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? जयंतरावांनी 25 वर्षांचा दाखला देत पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपच्या सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर रायगडमधील राष्ट्रवादीच्या एकमेव आमदार आदिती तटकरे यांनीही अजित पवार गटाला पाठिंबा दिला आणि त्या महायुती सरकारमधील एकमेव महिला कॅबिनेट मंत्री झाल्या. साहजिकच, रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना दिले जाईल, अशी शक्यता आहे.

NCP leader Aditi Tatkare
Udayanraje Bhosale : 'मी 35 वर्षे सक्रिय आहे, मला समाजकारण समजलं; पण अजून राजकारण लक्षात येत नाही'

परंतु, तटकरेंना पालकमंत्री पद देण्यास मुख्यमंत्री शिंदे समर्थक आमदार भरत गोगावले यांचा प्रचंड विरोध आहे. यापूर्वी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या सरकारमध्ये आदिती तटकरे राज्यमंत्री होत्या. त्यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊ नये म्हणून शिवसेनेने प्रचंड विरोध केला होता. त्यानंतरही त्यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले होते.

NCP leader Aditi Tatkare
लोकसभेसाठी मास्टर प्लान; मंत्रीपदाचा राजीनामा देऊन 'हा' बडा नेता निवडणूक लढवणार? कन्येलाही मिळणार संधी!

त्यामुळे नाराज झालेले शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आणि शिवसेनेतून बाहेर पडले होते. भाजपबरोबर सत्तेत सामील झाल्यानंतर मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे गटाच्या आमदारांना होती; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सामील झाला आणि पुन्हा महाविकास आघाडी सरकारसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

रायगडमधील शिंदे समर्थक आमदारांना मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. मागून आलेल्या आदिती तटकरे मंत्री झाल्या. त्यांना रायगडचे पालकमंत्री पद देऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. शिंदे समर्थक आमदारांच्या नाराजीवर तोडगा काडण्यासाठी रायगडचे पालकमंत्री पद उदय सामंत यांच्याकडे ठेवून रत्नागिरीची जबाबदारी आदिती तटकरे यांना देण्याबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची चर्चा आहे.

NCP leader Aditi Tatkare
Loksabha Election : कर्नाटकात मोठी उलथापालथ! लोकसभेची निवडणूक काँग्रेसला जड जाणार? BJP-JDS युतीच्या हालचाली

पालकमंत्रीपद देण्याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून या संदर्भातील निर्णय घेतील. रायगडचा पालकमंत्री कोण होईल, हे आता सांगणे कठीण आहे. ज्या जिल्ह्याचा मंत्री तो त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असतो, असे सूत्र आतापर्यंत राहिले आहे. अपवादात्मक वेळेला बाहेरचा पालकमंत्री दिला जातो. थोड्याच दिवसात चित्र स्पष्ट होईल.

- आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com