लोकसभेसाठी मास्टर प्लान; मंत्रीपदाचा राजीनामा देऊन 'हा' बडा नेता निवडणूक लढवणार? कन्येलाही मिळणार संधी!

सतीश जारकीहोळींनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्यामुळे बेळगाव मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
Belgaum LokSabha Election
Belgaum LokSabha Electionesakal
Summary

जारकीहोळी यांनी लोकसभा निवडणूक लढवून विजय मिळविल्यास यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होणार आहे.

बेळगाव : पालकमंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांनी अचानक 'यू टर्न' घेऊन लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

उमेदवारी निवड आणि लोकसभा निवडणूक (Loksabha Election) तयारी संदर्भात हालचालींना वेग आलेला असताना जारकीहोळी यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्यामुळे पक्षातील इच्छुकांना एक पाऊल मागे घ्यावे लागणार असल्याचे चित्र आहे.

Belgaum LokSabha Election
फडणवीस, बावनकुळेंना मी तलवार-वाघनख दिलंय, कारण शिवरायांनी..; काँग्रेसवर हल्ला करत काय म्हणाले उदयनराजे?

जारकीहोळी यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा गेल्या महिन्यांत केली होती. मात्र, शनिवारी अचानक निवडणूक लढवण्याची तयारी दाखविली आहे. पक्षाकडून निवडणूक लढविण्याचे आदेश मिळाल्यास लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे सांगत पालकमंत्री जारकीहोळी यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी यादीत 'एंट्री' घेतल्यामुळे अनेकांची 'विकेट' उडणार असल्याचे मानले जात आहे.

Belgaum LokSabha Election
ED च्या भीतीनं सत्तेत गेलो नाही, यापूर्वी अनेकवेळा सत्तेत जाण्याबाबत शरद पवारांनी चर्चा केली; मुश्रीफांचा गौप्यस्फोट

याशिवाय मागील सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केलेल्यांना 'वेट अॅण्ड वॉच'ची भूमिका घ्यावी लागणार आहे. काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारी ठरविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी बैठकही घेण्यात आली. या बैठकीमध्ये लोकसभेची जबाबदारी पालकमंत्री आणि मंत्र्यांवर सोपविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

Belgaum LokSabha Election
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? जयंतरावांनी 25 वर्षांचा दाखला देत पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका

या बैठकीनंतर सतीश जारकीहोळी यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस १३५ जागा जिंकून राज्यात सत्तेवर आला आहे. तसेच, १५ पेक्षा अधिक जागा जिंकताना वर्चस्व निर्माण करण्याचेही आव्हान आहे. त्यामुळे आखाड्यामध्ये तगडा उमेदवार उतरविण्याची तयारी काँग्रेसतर्फे सुरू आहे. जारकीहोळींनी २०१९ मध्ये लोकसभेची पोटनिवडणूक लढविली होती.

त्यामध्ये दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगल अंगडी यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत जारकीहोळी यांचा निसटता पराभव झाला. भाजपला सतत विजय मिळत असल्यामुळे बेळगाव भाजपचा बालेकिल्ला ठरला. त्यामुळे मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार मंगल अंगडी यांचा पराभव करावयाचा झाल्यास तितक्याच ताकदीचा व तगडा उमेदवार रिंगणात राहणे अपेक्षित आहे. यामुळे जारकीहोळी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

Belgaum LokSabha Election
Udayanraje Bhosale : 'मी 35 वर्षे सक्रिय आहे, मला समाजकारण समजलं; पण अजून राजकारण लक्षात येत नाही'

...तर 'यमकनमर्डी'त पोटनिवडणूक शक्य

पालकमंत्री जारकीहोळी यांनी लोकसभा निवडणूक लढवून विजय मिळविल्यास यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होणार आहे. तेथून त्यांच्या कन्येला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. एकंदरीत सतीश जारकीहोळींनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्यामुळे बेळगाव मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com