अजित पवार म्हणाले, सरकार चालवायचे असेल तर एकी गरजेची

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

गारठा अंगात मुरु नये म्हणून जरा व्यवस्थित राहतो
नागपुरात थंडी आहे, त्यामुळे गारठा अंगात येऊ नये म्हणून सध्या वेगवेगळे ड्रेस परिधान करत आहे. दिल्लीत असतानाही मी असे राहत होतो. त्यामुळे दिसायला बरे दिसते, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

नागपूर : जनतेतून थेट सरपंच, नगराध्यक्ष निवडीवर सभागृहात निर्णय घेताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही महाविकासआघाडी सरकारमधील पक्षांचे आमदार उपस्थित राहणे आवश्यक आहे. सरकार चालवायचे असेल तर एकी गरजेची आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या आज (मंगळवार) दुसऱ्या दिवशी महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांच्या आमदारांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी सरपंच, नगराध्यक्ष थेट निवडीचा मुद्दा मांडला. या बैठकीत तिन्ही पक्षांच्या नेत्यानी आमदारांना मार्गदर्शन केले. 

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला होणार 18 जणांचा शपथविधी 

या बैठकीनंतर अजित पवार म्हणाले, की विविध मुद्द्यांवर, मागण्यांवर चर्चेवेळी सभागृहात तिन्ही पक्षांचे 100 टक्के आमदार उपस्थित असावेत, आमदारांनी उपस्थित राहिले पाहिजे. सरकार चालवायचे असेल तर एकी गरजेची आहे. थेट सरपंच, नगराध्यक्ष निवड नको. असे बहुसंख्य आमदारांची मागणी आहे. बाजारसमितीबाबतही अशीच भूमिका आहे. विरोधक प्रत्येक गोष्टीत अडवणूक करत आहेत.

भाजपकडून शिवाजी महाराजांच्या नावाला गालबोट

गारठा अंगात मुरु नये म्हणून जरा व्यवस्थित राहतो
नागपुरात थंडी आहे, त्यामुळे गारठा अंगात येऊ नये म्हणून सध्या वेगवेगळे ड्रेस परिधान करत आहे. दिल्लीत असतानाही मी असे राहत होतो. त्यामुळे दिसायला बरे दिसते, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

राहुल-सावरकर-रेप इन इंडिया, काय आहे यामागचे सत्य?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar participate in Mahavikasaghadi meeting in Nagpur