छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीला; काय असेल निरोप?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने शनिवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवारांना राष्ट्रवादीने आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले होते.

मुंबई : भाजपसोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मनधरणी करण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न आज (सोमवार) सलग तिसऱ्या दिवशी सुरुच असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने शनिवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवारांना राष्ट्रवादीने आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणतेच अधिकार नाहीत. तेव्हापासून अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत.

भाजपचा डाव उधळून लावण्याची तयारी 

रविवारी सकाळी सुरवातीला दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले. त्यानंतर जयंत पाटील याठिकाणी आले. सुमारे दोन तास यांच्यात चर्चा झाली. पण, अजित पवारांचे मन वळविण्यात हे नेते यशस्वी झाले नव्हते. आता छगन भुजबळ अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले असून, त्यांच्यात चर्चा सुरु आहे. 

उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याने अजित पवारांचे बंड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Chagan Bhujbal meets Ajit Pawar in Mumbai