esakal | ईडीच्या चौकशी हेतूवरच संशय - खडसे
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse

ईडीच्या चौकशी हेतूवरच संशय - खडसे

sakal_logo
By
नामदेव कुंभार

भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचलनालय) एकनाथ खडसे यांना समन्स बजावला आहे. प्रकृती अस्थिर असल्यामुळे खडसे चौकशीला हजर राहणार का? याबाबत संभ्रम होता. मात्र, पत्रकार परिषद घेत चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. यावेळी हा सर्व प्रकार राजकीय हेतूतूनच होत असल्याचं त्यांनी म्हटलं.

भाजपमधून राष्ट्रवादीत आल्यानंतर पुन्हा चौकशी का सुरु झाली? पाच वर्षानंतर पुन्हा या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. आतापर्यंत पाच वेळा मी चौकशीला हजर राहिलो आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशी हेतूवरच मला संशय आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांची आज ( दि. ८ जुलै २०२१ ) होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. आज, ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. बुधवारी त्यांना ईडीनं समन्स बजावले होते. खडसे यांना गुरुवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ‘ईडी’ने बुधवारी सकाळी अटक केली. विशेष न्यायालयाने त्यांना येत्या १२ पर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा: राज्यात चार दिवस मुसळधार पाऊस; कोकणात अतिवृष्टीचा इशारा

काय आहे भोसरी जमीन प्रकरण

या सर्व आरोपांच्या केंद्रस्थानी भोसरी जमीन खरेदी प्रकरण राहिले. पुणे शहरालगत भोसरी एमआयडीसीत ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाताई व जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी करण्यात आली. या व्यवहारात खडसेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता, तर एमआयडीसीची जमीन खरेदी करता येत नाही, शिवाय कोट्यवधींची जमीन कवडीमोल दरात खरेदी करण्यात मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार, फिर्यादही याप्रकरणी नोंदविण्यात आली होती. भोसरी येथील जमिनीची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असताना ती केवळ ३.७५ कोटी रुपयांना खडसे यांच्या कुटुंबीयांना विकण्यात आल्याचा आरोप केला होता. न्या. झोटिंग समितीने या प्रकरणाची चौकशी केली, सोबतच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी करून खडसेंना क्लीन चीट दिली होती. झोटिंग समितीचा अहवाल खडसेंनी वारंवार मागणी करूनही जाहीर झाला नव्हता.

हेही वाचा: राणेंना मंत्रिमंडळात स्थान; शिवसेनेनं दिलं थेट आव्हान

पाच वर्षांनंतरही दिलासा नाही

खडसेंनी फडणवीस सरकारमधून याच प्रकरणावरून जून २०१६ला राजीनामा दिला. पाच वर्षे उलटली, तरी भोसरी प्रकरण त्यांचा पिछा सोडताना दिसत नाही. खडसे त्यावर आता कोणता पवित्रा घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

loading image