'आज आई असती तर...'; शपथविधीनंतर जयंत पाटील झाले भावूक!

टीम ई-सकाळ
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

समृद्ध महाराष्ट्राच्या सोबतच सुखी आणि आनंदी महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करू. माझे नेते शरद पवार साहेब आणि माझे सर्व सहकारी यांचे मी विशेष आभार मानतो.

मुंबई : ''माझ्या यापूर्वीच्या प्रत्येक शपथेनंतर आशीर्वाद द्यायला आई असायची. आज आई नाही, याची खंत आहे. ती असती तर तिला खूप आनंद झाला असता. आई जिथे कुठे असेल तिथून मला पाहून नक्कीच आशीर्वाद देत असेल,'' अशी भावनिक पोस्ट राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असेल. शेतकरी, युवा व महिला वर्गाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही योजनांची आखणी व अंमलबजावणी करू.निर्णय घेताना जनता व सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ असेही ते म्हणाले. 

- हिच ती वेळ! मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की...

केवळ आताच्याच नाही, तर येणाऱ्या पिढयांना देखील आनंदाने या राज्यात जगता येईल, असे राज्य उभे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. समृद्ध महाराष्ट्राच्या सोबतच सुखी आणि आनंदी महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करू. माझे नेते शरद पवार साहेब आणि माझे सर्व सहकारी यांचे मी विशेष आभार मानतो.

-  मी, जयंत कुसूम राजाराम पाटील शपथ घेतो की...

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांच्या लाखो कार्यकर्त्यांचे मी विशेष अभिनंदन करतो. हा विजय या तिन्ही पक्षातील लाखो कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि मी तो त्यांनाच समर्पित करू इच्छितो. गाच्या नकाशावर हा महाराष्ट्र नेण्यासाठी आम्ही सर्व सहकारी रक्ताचे पाणी करून अथक मेहनत घेऊ, इतकाच शब्द मी आज आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेला देतो असेही त्यांनी म्हटले आहे. 

- उद्धव यांच्याकडे पाहून राज यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Jayant Patil became emotional with the memory of his mother after taking the oath