
इंदिरा गांधी यांचा याच जनतेनं पराभव केला आणि याच जनतेनं त्यांना डोक्यावर बसवलं.
Jayant Patil : पक्ष पळवणं हा दिवसा ढवळ्या घातलेला दरोडाच; NCP प्रदेशाध्यक्षांचा CM शिंदेंवर घणाघात
सांगली : अनेक दिवसांपासून सुरु असलेला पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगानं निकाली काढला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय आयोगानं (Election Commission) घेतला, त्यामुळं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
पक्षचिन्हासोबतच शिवसेना (Shiv Sena) नावदेखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला मिळालं आहे. यापूर्वी निवडणूक आयोगानं हंगामी निर्णय देताना दोन्ही गटांना वेगवेगळं चिन्ह दिलं होतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केलीये.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील विविध वॉर्डातील विकासकामांचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्यांनी शिंदेंवर हल्लाबोल केला. काळ बदलला आहे. न्याय बदलला आहे. जे न्याय देतील अशी अपेक्षा असते तेच डोळ्यावर पट्टी बांधून न्याय देत आहेत. एक पक्षच पळवण्याचं काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असल्याचा घणाघात जयंत पाटलांनी केला.
पाटील पुढं म्हणाले, आता न्याय जनतेच्या न्यायालयातच जाऊन करावा लागेल. इंदिरा गांधी यांचा याच जनतेनं पराभव केला आणि याच जनतेनं त्यांना डोक्यावर बसवलं. देशात कायदा आहे की नाही याची शंका आता लोकांच्या मनात येत आहे. जे न्याय देणारे आहेत, तेच डोळ्यावर पट्टी बांधून न्याय देत आहेत.
आठ लाख कागदपत्र उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देऊनही निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजून दिला आहे. निकाल देताना आमदारांच्या संख्येचा विचार केला गेला. निकालाचंही काम पूर्ण झालं नाही. पण, आम्हाला कोणीतरी सांगत आहे म्हणून लवकर निर्णय केल्याचं जयंत पाटील म्हणाले.