esakal | "त्या हॉटेलमध्ये गिते पडले होते पवारांच्या पाया"
sakal

बोलून बातमी शोधा

anant geete

"त्या हॉटेलमध्ये गिते पडले होते पवारांच्या पाया"

sakal_logo
By
रश्मी पुराणिक

मुंबई: "राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे" असे वक्तव्य शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री (Anant Geete) अनंत गिते यांनी केले. त्याला रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी उत्तर दिलं आहे.

"2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी नावाची लाट आली असताना रायगड मतदारसंघातील जनतेने गिते यांना पराभूत केले. ते विजनवसात कुठे होते, माहीत नाही. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवड होत असताना अनंत गिते आले होते. तेव्हा पवार साहेब होते. त्यांनी वाकून पवार साहेबांच्या पायाला हात लावून आभार मानले होते" असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

हेही वाचा: शिवाजी पार्कचा स्वीमिंग पूल कधी सुरु होणार? महापौर म्हणाल्या...

"चंद्रकांत पाटील यांनी एक महिन्याआधी असंच वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाला फक्त संजय राऊत यांनी उत्तर दिले होते. याला माजी केंद्रीय मंत्री उत्तर देतील असं वाटलं होतं. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. अशी अनंत गितेची अवस्था आहे. ते बोलल्याने फरक पडत नाही. सुर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. शरद पवार आघाडीचे जनक आहेत. उद्धव ठाकरे सक्षमपणे कारभार चालवत आहेत" असे सुनील तटकरे म्हणाले.

हेही वाचा: गद्दारांना तिथेच दोन लावा, पोलिस केसेसचं मी पाहतो - सुनील केदार

"अडगळीत पडलेल्या नेत्यांना भान राहिलेलं नाही. त्याच नैराश्यापोटी आलेल विधान आहे. एक व्यक्ती बोलल्याने पवार साहेबांचं स्थान कमी होणार नाही. स्थानिक पातळीवर कलगीतुरा असण्याचा प्रश्न नाही. रायगड मध्ये आघाडी धर्म पळून काम करत आहोत. स्थानिक पातळीवर संवाद कसा राहील याची काळजी घेत आहोत" असे सुनील तटकरे म्हणाले.

loading image
go to top