अजित पवारांनी चूक मान्य करावी, त्यांच्यासाठी तेच चांगले : मलिक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

अजित पवारांनी चूक मान्य करावी, त्यांच्यासाठी तेच चांगले होईल. आम्ही तिन्ही पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेलो आहेत. आज सकाळी अमळनेरचे आमदार भाईदास पाटील परत येतील असे संकेत दिले आहेत. बाकी आमदारही परत येतील, अशी आशा आहे.

मुंबई : अजित पवारांनी चूक केली आहे, त्यांनी त्यांची चूक मान्य करावी. त्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने काल (शनिवार) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवारांनी काही आमदारांसह राजभवनात शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने आपला याला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणतेच अधिकार नाहीत.

शरद पवारांसोबत 51, तर अजित पवारांकडे फक्त 3 आमदार
 
मलिक म्हणाले, की अजित पवारांनी चूक मान्य करावी, त्यांच्यासाठी तेच चांगले होईल. आम्ही तिन्ही पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेलो आहेत. आज सकाळी अमळनेरचे आमदार भाईदास पाटील परत येतील असे संकेत दिले आहेत. बाकी आमदारही परत येतील, अशी आशा आहे. आम्ही या सरकारला बहुमत सिद्ध करू देणार नाही. त्यापूर्वी नैतिकतेच्या आधारे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचे सरकार चुकीच्या पद्धतीने गठीत करण्यात आले आहे.

अजित पवार यांच्या सहा वर्षांतील तीन चुका; राजकीय कारकिर्द धोक्यात?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Nawab Malik statement about Ajit Pawar