'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे'; राऊतांच्या वाढदिनी मलिकांच्या हटके शुभेच्छा I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Politics

मलिक यांनी केलेल्या वाढदिवसाच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे'; राऊतांच्या वाढदिनी मलिकांच्या हटके शुभेच्छा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मागील काही दिवस राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक हे सातत्याने पत्रकार परिषद घेते आहेत. त्यांच्या या परिषदांमध्ये होणार गौफ्यस्फोट यामुळे ते चर्चेत आले आहेत. आता पुन्हा एकदा आणखी एक ट्विट केले आहे. हे ट्विट आहे संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्तचे आहे. राऊत यांना ट्विटमधून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणी मलिक यांनी केलेल्या विविध आरोपांविषयी विरोधकांकडून त्यांच्यावर टीका सुरु होती. यावेळी खासदार संजय राऊत यांनी त्यांची पाठराखण केली होती. आता मलिक यांनी केलेल्या वाढदिवसाच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या अंत्यदर्शनाला गर्दी, मान्यवरांकडून श्रद्धांजली

मलिक यांनी ट्विटमध्ये शोले चित्रपटातील प्रसिद्ध गाणं लिहल असून ते संजय राऊत यांना टॅग केलं आहे. ते म्हणतात, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर,तेरा साथ ना छोडेंगे Happy Birthday Sanjay Raut ji, अशा शुभेच्छांचा वर्षाव त्यांनी केला आहे.

हेही वाचा: थंडी गायब? पुढील 4-5 दिवस धो-धो पाऊस होणार | IMD

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाच्या काही मंत्र्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) नवाब मलिक (Nawab malik) यांनी आरोप केले होते. "ज्यांनी ईश्वराच्या नावावर जमिनी घेतल्या, घोटाळा केला. त्या सगळ्यांना तुरुंगात टाका. ईडीने यात सहकार्य करावं" असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. "भाजपाच्या माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडप केली. त्याचा भांडाफोड करणार" असे नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.

loading image
go to top