
Rajesh Tope Video : राजेश टोपे झाले रोमँटीक; पत्नीसाठी गायलं…
राजकीय क्षेत्रातील नेत्यांना आपण नेहमी पाहतो ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. पण कधी कधी राजकीय नेत्यांच्या मनातील हळवा कोपरा देखील आपल्याला पाहायला मिळतो.
दरम्यान कोरोनाच्या लाटेत आरोग्यमंत्री पद सांभाळणारे राज्याचे तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची अशीच एक वेगळी बाजू पाहायला मिळाली. माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचा हटके अंदाज समोर आला आहे.
राजेश टोपे यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ते चक्का गाणं गाताना दिसत आहेत. तेही आपल्या सौभाग्यवती मनीषा टोपे यांच्यासाठी.त्याचं झालं असं की, राजेश टोपे यांच्या वाढदिवस होता.यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मतदार संघ असलेल्या घनसावंगीतील एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा: Maharashtra Politics : "आज भाच्याने सगळ्यांना 'मामा'बनवलं"; राष्ट्रवादीच्या नेत्याचा खोचक टोला
हेही वाचा: Hardik Pandya Viral Video : टीम इंडियात फूट? भर मैदानात पांड्याने विराटला केलं फुल इग्नोर
या कार्यक्रमात टोपेंना कार्यकर्त्यानी गाणं गाण्याचा आग्रह केला. मग टोपेंनीही आपल्या पत्नीसाठी एक गाणं गायलं. टोपेंनी माइक हातात घेत 'चांद सी मेहबुबा हो मेरी जबं ऐसा मैंने सोचा था" हे रोमँटीक गाण त्यांच्या पत्नीसाठी गायलं. हे गाणं गाताना पाहून पाहताना मनीषाताई देखीव एकदम खुश झाल्याचं दिसलं.
राजकीय डावपेचात अडकून पडलेल्या राजकारण्याने आपल्या पत्नीसाठी कार्यक्रमात गाणं गायलं याची सर्वत्र चर्चा होतेय.